कोणाची चाहूल लागे तुला ?

दारात तुझ्या
पाऊलठसे,
कोणाची चाहूल
लागे तुला ?

मन भरू येता
एकले एकले होता..
हात धरू कोणाचा
वाटे तुला ?

शून्यात नजर
मनात काहूर,
कोणास पाहून
लाज वाटे तुला ?

ज्या जन्मसख्याची
पाहिलीस वेडी वाट
त्याला सांगायला
का भिती वाटे तुला ? …

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe