नातं.. कोडं.. आधार .. गरज.. नक्की काय ?

माणसाला कोड्याची ओढ खूपच आदिम काळापासूनची, स्वत:ला विविध प्रश्नांनी वेढून घेणं हा त्याचा छंदच होता जणू.. आणि तो आजतागायत आहे. मग ते कोणत्याही स्वरूपाचं ढंगाच असो. मला ही असे काही प्रश्न पडत असतात.. असाच एक प्रश्न.. “नातं” ..
नात्याचा अर्थ, नाजूकपणा .. ब्ला ब्ला ब्ला मी इथ मांडणारच नाहीये.. त्यावर माझी लिहीण्याची ताकद नाही आणि मी लिहीलंच तर तुमच्यात ना ते सहन करण्याची.. फक्त मला प्रश्न पडलाय नातं म्हणजे काय..
न + आंत = नातं ?
कित्येकदा असं सहज म्हणून जातो . अरे माझा अमुक अमुक आहे .. सहन करावं लागतं सांगतो कोणाला.
खरतर दोन मनं जवळ आली की एक जे तयार होतं जे फक्त त्या दोघांनाच खर कळतं ते नातं (आता लगेच ते दोघ म्हणल्यावर प्रेम.. लफडी असे घासलेले शब्द मनातही आणू नका.. दोन गुंडांमधे पण नातं असतंच की मुन्नाभाई आणि सर्किट सारखं) मग त्या गोष्टीला नात्याची खरतर गरज नसते.. त्याला मैत्री अस नाव तरीही लोक देतातच.. माहित नाही का..कॉलेजमधे इतके मित्र होतात .. त्यातले किती संपर्कात रहातात.. त्तरीही आपण मित्र म्हणतो.. अडचणीच्यावेळी आपण एकमेकांना मदत करतो .. आपल्याशी काही नातं नसताना जेंव्हा मित्र ब-याचदा गायब असतात.. त्याला आपण लगेच नाव देतो .. माणुसकीच्या नात्यानं .. अरे .. काय गरज… आणि राखी बंधनाला किंवा इतर डेज ना तर उत येतो .. काहि मुली तर मुद्दाम संशय येउ नये किंवा संरक्षण म्हणून मानलेला भाऊ आणि मग पुढे ब्ला ब्ला .. ओ मॅन .. काय हे.. अरे साध कमीत कमी नात्याने जगूच शकत नाही माणूस..
आणि तोच माणूस बिझनेस करताना माणूस मात्र सर्व नाती सहज विसरू ही शकतो आणि फक्त तीच पैशाकरता जपूही शकतो.. पण खरंच किती ती निभाऊन नेतो .. ते देवालाच ठाऊक !

हे नातं कसं असत माहित आहे का? शाईचा एक थेंब जर ग्लासभर पाण्यात टाकला तर जसा तो पाण्याचा रंग बदलतो.. किंवा किमान त्याच्या अस्तित्वात बदल आणतोच, त्याचा रंग बदलतोच .. तस तुम्ही या जगात जन्माला आल्यावर काहीसं होतं .. एकदम तुम्ही सर्वांचे होऊन जाता आणि तुमच्या हातात फक्त नाती उरतात. बर ही नाती आहेत तेवढी पुरेशी वाटत नाहीत की काय म्हणून आयुष्याच्या एका महत्वाच्या वयात आपण अजून नाती वाढवतो. कारण .. ते ही तुमच्या हातात नसतं .. इतर नाती जपायची असतात ना !
अजून ही अपूर्णच आहे हे सर्व .. पण तरीही पब्लिश करणार आहे..
कदाचित हा थोडा निबंधाकडे किंवा रटाळ गोष्टीकडे गेलाय लेख .. पण ठीक आहे.. वाचणारे माझे कोण आहेत तरी असे.. कंटाळले तर विन्डो बंद करतील.. किंवा शिव्या घालतील.. पण मी लिहिलंय ते हेच आहे.

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe