नाद हरिहरन !!

image by theepan

गेल्या महिन्यात  प्रसाद चा एसेमेस आलेला ..

प्रसाद हा माझा खूप जुना लहानपणा पासूनचा मित्र व सांगीतिक सहप्रवासी आहे .. खरतर भारतीय संगीत ऐकायला जी कानाला सवय लागते ती मला याने लावली असं म्हणायला हरकत नाही, कधी संपर्कात असतो कधी नासतो .. पण आला कि अशी काहीशी सुरुवात करतो.  आता खूप दिवसानी मित्राला एसेमेस पाठवतोय तेव्हा आपण हाय हेलो असं पाठवतो .. किवा काय? कुठे आहेस? कसा आहेस? वगैरे .. ह्याने हा मेसेज पाठवला ..

जमाल  : सौंदर्य , आरस्पानी सुंदरता ..

मला लगेच ओळी आठवल्या .. आणि हे ही जाणवलं की हे त्याने त्या ओळी आठवून द्यायलाच मेसेज मध्ये पाठवलाय .. हरीजींची अनेक गाणी [ तुमेरे साथ ही है .. तुही रे .. किंवा रोजा जाने मन .. खरच अनेक … ] सर्वांना माहीत आहेत .. लोक त्यांचे चाहते आहेत .. त्यातलाच मी एक .. पण मला त्यांची ओळख झाली ती “काश ” या अल्बम मुळे ..  त्यातलच एक सुरेख गाणं ..

ये आईने से .. अकेले मे .. गुफ्तगू क्या है ?..
जो मै नाही हुं .. तो फिर तेरे .. रूबरू .. क्या है ?

त्यातलीच ओळ होती .. “तेरा जमाल नाही है तो .. चारसु क्या है ?? ” .. एकदम १० वर्ष मागे गेल्या सारख वाटायला लागलं, प्रसाद आणि मी खूप गजल ऐकायचो .. तो क्लासिकल पण ऐकायचा .. मला मात्र गजल जास्त आवडायची .. अजून ही आवडते ..  पण काश मधला गजल चा प्रकार खरच वेड लावणारा आहे .. त्या मुळे एका मागून एक .. हाजीर , गुलफाम , जश्न .. सतत लूप मध्ये ऐकत राहिलो .. जवळपास ४-५ वर्ष ..  मला वाटलं की परत त्याच दिवसात आपण आहोत .. आणि आज रात्री प्रसादला काश किंवा हाजीर ची नवीन कोरी कॅसेट ऐकायला बोलावू आणि मस्त कॉफी चा प्रोग्राम करू ..

पण तसा काही होणार नाही हे दुसऱ्या क्षणाला जाणवल ..

दोनच दिवसानी परत प्रसाद चा फोन..

प्रसाद : soul india नावाचा हरि भाऊंचा प्रोग्राम आहे म्हणे पुण्यात  ! २८ फेब ला येणार का ?
मी : अरे सही .. खूप दिवसानी .. नक्की जाऊ या ..
प्रसाद : बर मग नेट वर पहा तिकीट मिळतायत का ?
मी : आहेत ..
प्रसाद : करा मग दोन बुक  ..

done !  इतक झटकन ठरल .. नंतर फक्त प्रतीक्षा होती आठवड्याभराची ! .. गणेश कला क्रीडा मंचावर कार्यक्रम होता आणि कार्यक्रम ८ वाजता होता तरी आम्ही ६ लाच तिथे जाऊन धडकलो ..  रांगेत उभे होतो .. मधून मधून audio tuning चे आवाज येत होते .. व त्यावरून मनाला .. हे गाणं आहे .. हेही गाणं आहे .. असे दिलासे मिळत होते .. तब्बल दोन तासांची प्रतीक्षा झाल्या वर आत सोडलं .. सर्वानी जागा पटकावल्या ..  संयोजकांनी खूप ठिकाणी माती खाल्लेली होती .. पण हरीजीन्च्या गाण्यासाठी सर्व काही दुर्लक्षित करून आम्ही बसून होतो ..

अखेर पद्मश्री हरिहरन यांची एन्ट्री झाली .. निवेदिकेच मराठी मार खाईल इतक्या सुरेख मराठीत त्यांनी  बोलायला सुरुवात केली .. पहिलं गाणं कोणत असेल याची उत्सुकता मला होतीच .. पण ती फार न ताणता त्यानी कार्यक्रम सुरु केला ..  संपूर्ण पणे आधुनिक वाद्ये असलेल्या  साज संचा मध्ये  त्यानी ड्रमस, गिटार, मेटल फ्लूट च्या साथीने .. गायला सुरुवात केली ..

तीर्थ विठ्ठल .. क्षेत्र विठ्ठल ..
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल  …

खरोखर रोमांच उभे रहावेत  अस सादरीकरण .. धीर गंभीर आवाज व  त्या मध्ये घेतलेल्या जागा .. आलापी .. साथ सांगत .. आणि त्यांची तन्मयता .. हाव भाव .. मंत्रमुग्ध झाले होते वातावरण ..

त्या नंतर .. legendary तू ही रे .. मग रोजा जानेमन, ऐ हैरते आशिकी, यादे मधलं शीर्षक गीत .. कृष्णा ..

.. मग मधून च एखाद स्वताच्या मुला बरोबर  एक्स्परिमेंट ..  जोगवा मधले जीव रंगला गुंगला … एक से एक गाणी सादर होत होती .. लोकांशी संवाद साधत आणि मजा घेत घेत ..

गात असताना हरीजीन्च्या अंगातच संगीत भिनत असत. म्युझिक च्या तालावर ते नाचत असतात .. आवाज देत असतात .. प्रोत्साहित करत असतात .. मी तुमच्या समोर माझ बेस्ट देतोय .. तेव्हा तुम्ही मनापासून त्याचा आनंद घ्यावा असंच ते वाटत! .. आणि ते संगीत हळू हळू आपल्या ही अंगात भिनत जातं..


ये आईनेसे अकेले मे .. हे एकत् असताना खूपच भारी वाटायला लागलं होत .. लोकांनी गजल ची मागणी केली  तर ते म्हणाले .. प्लीज गजल मागू नका .. एकदा सुरु झालो तर मलाही कंट्रोल नाही होणार .. रात्र इथेच जाईल .. असं म्हणत .. एक छोटी रचना म्हणून दाखवली ..   त्या नंतर कोकणस्थ चित्रपटात गायलेलं duet “माझ्या आधी वर जायचं नाही .. ” हे गाणं सादर केलं..

झाकीर हुसैन जी बरोबर केलेल्या हाजीर २ या अल्बमच्या उद्घाटनाची माहिती त्यानी दिल्या नंतर प्रसाद पटकन जाऊन येतो म्हणाला .. आणि कार्यक्रम संपल्यावर हाजीर२ ची सी डी त्याने हातात ठेवली माझ्या !!

 आता ती त्याने पळवली आहे .. परत ऐकायला मिळण्याची वाट पाहत आहे ..

कार्यक्रमात काही किरकोळ पुणेरी किस्से ही झाले .. पण त्याला कोण जुमानत? हरिभाऊ नी गायला सुरु केल्यावर सर्व विसरायला होत होतं. या आधी शंकर एहसान लॉय चा कार्यक्रम ऐकला होता लाईव्ह … त्या नंतर हा .. घरी आल्या नंतर ही कानात घुमत च होता ..

नाद हरिहरन …

 

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe