प्रश्नंच् प्रश्नं

काही तरी चुकतंय् !
की परत तेच घडतंय् ?

पाऊल माझं अडलंय् !
की त्याच दिशेने वळलंय् ?

भूतकाळाने ग्रासलंय..
मन कुठं रमलंय् ?

वेगळेपण जपू पहातोय!
मन जागेवर कुठंय् ?

हं..
शांत स्तब्ध रहायला हवं
वा~यात मिसळून गायला हवं
मला आता जगायचंय् !!
माझं मी होऊन !

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V - render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe