मी कसा आहे?

मी कसा आहे ?
तुम्हाला हवा तसा आहे..
फिशटँक मधला मासा आहे ..

मी कसा आहे ?
सुन्न डोळ्यांचा हसरा चेहरा आहे ..
जणू तुमच्या मनाचा आरसा आहे..

मी कसा आहे?
शब्द माझे जीव ..
अश्रू माझे प्राण
माणूस असावा अगदी तसा आहे ..

मी थोडा असा आहे
मला एकान्ताची साथ ..
माझी अनुभावाची वाट ..
चेहरे शोधणारी
माझी वेगळी जात आहे…

मी थोडा असा आहे
थोडा वेडा थोडा शहाणा ..
पायात माझ्या काटेरी वाहाणा ..
आधाराला हाती
नियतीची काठी ..
तिच्यासोबत आयुष्य
आता जगणार आहे ..

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe

  • aye sahi ahe hi kavita!
    khup diwasani aj tuzya hya blogwar ale!! chhan watla!!

    pan kiti diwasat updatech nahi kelays? kavitankadehi laksh de ki “kalakaraa” 🙂

  • ho khara laksha dyayla pahije ..
    pravaha madhe ti magech rahoon geli ..