वाडा

कोसळल्या तुळया
उरले चार कोपरे
भुईसपाट वाडा
उरले मातीचे ढिगारे

आठवणींचा धुळारा
आसमानास भिडला
आदिमवृद्ध प्राजक्त
क्षणात आडवा झाला

हातातील हात नकळत
सुटतील जातील दूर
वाड्याची संपेल घटका
संपेल साराच नूर

आगतिक किती चेहरे
रडके हताश बावरे
हसतील उद्यास जेव्हा
उठतील इथे मनोरे

उरतील आठवणी
वाड्यातील भांडणांच्या
गणपतीतील मखराच्या
चौकातील भोंडल्याच्या

..

उडतील पाखरेही, जातील दूर देशा
होतील ते रिकामे, मोजून रोख पैसा

म्हणतील ते मनात, गेले ते दिन गेले
चिकटून राहिल्याचे, पुरतेच चीज झाले !

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe