झटपट वेबसाईट सुरु करा, काही मिनीटात तुमचा व्यवसाय जगाशी जोडा !

इंटरनेटचं युग आहे, त्यामुळे तुमचा व्यवसाय हा ऑनलाईन हवाच! प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाची उत्तम वेब साईट असावी व त्याद्वारे आपल्याला अधिकाधिक ग्राहक मिळावे असे वाटत असते.

इंटरनेटवर वेबसाईट करणे हे तसे खर्चिक काम असते व वेळ खाणारेही. म्हणूनच काही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स नी ही गरज ओळखून काही वर्षांपूर्वीच ब्लॉगर, वर्डप्रेस आणि इतर अर्ध स्वयंचलित वेबसाईट नियंत्रक प्रणाली विकसित केल्या. परंतु त्याही सर्वसामान्य माणसाला वापरणे मुश्किल होत होते. काही अशा सेवा विकसित झाल्या ज्या फक्त तुमच्याकडून माहिती, फोटो व काही पर्यायांची उत्तरे घेतात आणि  तुमची वेबसाईट झटपट तयार होते.  अशा कोणकोणत्या सेवा आहेत चला पाहूया ..

Google साईट्स

फायदे :

  • वापरायला अतिशय सोपं, काही क्लिक्स मध्ये तुमचे वेबपेज तयार होते.
  • मोफत व ज्यांना अतिशय मूलभूत पण माहितीपूर्ण  साईट बनवायची आहे, त्यांच्या साठी उपयुक्त.
  • विविध रंगसंगती उपलब्ध
  • गुगल drive मधील सर्व माहिती व फाईल्स इथे दाखवता येतात, तसे एम्बेड करायची सोय
  • गुगल बिझनेस सेंटर व गुगल सर्च चा लाभ.
  • वेबसाईट किती लोकांनी पाहिली व काय काय लोकप्रिय आहे, हे सांगणारी यंत्रणा “analytics” यातच अंतर्भूत
  • जी-सूट चा एक भाग असल्याने तुम्हाला सर्व google च्या सेवा उदा. गुगल maps, जीमेल chat, ब्लोग्गर यासेवेशी निगडीत करता येतात.
  • ही सेवा गुगल ने तयार केलेली आहे त्यामुळे एसीओ SEO (Search Engine Optimization) ला ही मदत करते.

तोटे :

  •  तुम्हाला यासाठी जीमेल खाते असणे आवश्यक आहे. त्यासोबत गुगल च्या बिझनेस केंद्राशी तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • अतिशय मर्यादित डिझाईन पर्याय आहेत.
  • इ कॉमर्स चे पर्याय नाहीत.
  • माहिती जोडणे सोपे असले तरी layout करण्यास सुद्धा बऱ्याच मर्यादा आहेत.
  • स्वताचे डोमेन या सेवेला अजून तरी जोडता येत नाही, त्यामुळे त्याचा पत्ता google शी निगडीत राहतो व व्यवसायाचे इम्प्रेशन पडत नाही.